*कोकण Express*
*दीपक केसरकरांच्या विरोधात सावंतवाडीत शिवसेनेचा मोर्चा….*
*निवासस्थानासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शिवसेनेचे सर्व आमदार व आमदार दीपक केसरकर यांच्या बंडखोरी विरोधात आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिकांनी सावंतवाडीत जोरदार मोर्चा काढला. यावेळी ‘दीपक केसरकर चोर है’ अशा आशयाच्या घोषणा देऊन त्यांनी जोरदार नाराजी व्यक्त केली. दरम्यान केसरकर यांच्या निवासस्थाना समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी टाळ्या वाजवत केसरकर यांचा निषेध करण्यात आला. जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सर्व कार्यकर्ते गांधी चौकच्या दिशेने मार्गस्थ झाले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक या मोर्चामध्ये सामील झाले होते.यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते,माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर,अतुल रावराणे,नागेंद्र परब,जानवी सावंत,विद्या परब, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ,यशवंत परब,विक्रांत सावंत,चंद्रकांत कासार,शब्बीर मणियार, अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे,गुणाजी गावडे,सागर नानोस्कर,योगेश नाईक,गोविंद हिराप आदी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी या मोर्चात सहभागी झाले होते.