“शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ उद्या सावंतवाडीत भव्य रॅली”

“शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ उद्या सावंतवाडीत भव्य रॅली”

*कोकण Express*

*”शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ उद्या सावंतवाडीत भव्य रॅली”*

*शिवसेना नेते संदेश पारकर आणि जिल्हाप्रमुख संजय पडते यांची माहिती*

शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभुमीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ उद्या सोमवार दि.27 जुन रोजी सावंतवाडी शहरात गवळी तिठा येथे सकाळी 10 वाजता शिवसेनेच्या वतीने भव्य “मुख्यमंत्री समर्थन रॅली” काढण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना नेते संदेश पारकर आणि जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिली. या रॅली नियोजन संदर्भात आज शिवसेना सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. सध्याच्या राजकीय परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी एकमताने करण्यात आला.*
*या बैठकीस सिंधुदुर्ग महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी युवासेना जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे, रश्मी माळवदे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश नाईक, युवासेना समन्वयक गुणाजी गावडे, विनायक सावंत, चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, बाळु माळकर, विनायक सावंत, साधना कळंगुटकर, रुपाली चव्हाण, नमिता झारापकर, विद्या परब यांच्यासह सावंतवाडी तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!