*कोकण Express*
*_पालकमंत्री गुवाहाटीत; कणकवलीत भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेना शाखेसमोर फोडले फटाके!_*
*_भाजपा कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी_*
*कणकवली/प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे अचानक आज शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. पालकमंत्रीच भाजप सोबत सरकार स्थापन करण्यासाठी शिंदे गटात सामील झाले. यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी कणकवली फटाके लावून जल्लोष साजरा केला. भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत पालकमंत्री उदय सामंत यांचे शिंदे गटात गेल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत भाजप च्या हिंदुत्वाची कास धरण्यासाठी समर्थन दिल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी समाधान देखील व्यक्त केले. यावेळी कणकवली पटवर्धन चौक व शिवसेना शाखेसमोर फटाके फोडून भाजपा कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक शिशीर परुळेकर, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभुगावकर, सिद्धेश वालावलकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.