*कोकण Express*
*राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना आमदार वैभव नाईक यांचे स्वागत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवसेना आमदार वैभव नाईक यांचे कणकवलीत स्वागत करण्यात आले. शिंदे बंडानंतरही शिवसेनेशी एकनिष्ठ राहत महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष नंत पिळणकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, सुजल शेलार आदी उपस्थित होते.