*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात केसरकर यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक…!*
*आम.केसरकर यांच्या कार्यालया’च्या तोडफोडीचा प्रयत्न…!*
*सावंतवाडी – प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे बंडखोर नेते व राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे सावंतवाडीतील संपर्क कार्यालयावर कडेकोट पोलिस बंदोबस्त असताना देखील शिवसैनिकांनी दीपक केसरकर यांच्या कार्यालयावर हल्ला केला. दिपक केसरकर यांची शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. केसरकर यांनी या गटाची बाजू मांडत असताना मुख्यमंत्र्यांनी बद्दल आक्रमक भूमिका मांडली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत
केसरकर यांच्या कार्यालयावर हल्ला केला. हल्लेखोर
शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. तर राज्यभरात शिंदे व बंडखोर आमदारांच्या विरोधात
शिवसैनिक आक्रमक झाले असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील त्याचे पडसाद दिसू लागले आहेत.