“सिंधुदुर्ग शिवसेना पुर्ण ताकदीनिशी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी”

“सिंधुदुर्ग शिवसेना पुर्ण ताकदीनिशी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी”

*कोकण Express*

*”सिंधुदुर्ग शिवसेना पुर्ण ताकदीनिशी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी”*

*शिवसेना नेते संदेश पारकर*

शिवसेना आमदारांच्या बंडाच्या पार्श्वभुमीवर आज शिवसेना नेते श्री.संदेश पारकर यांनी दोडामार्ग तालुक्याचा दौरा केला. यावेळी श्री.पारकर यांनी शिवसेना शाखेत दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेवर कोणताही परिणाम झालेला नसुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पुर्ण ताकदीनिशी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख कॅबिनेट मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. शिवसेनेशी बंडखोरी करुन जे कोणी आमदार गेलेले आहेत त्यांना पुढील निवडणुकीत शिवसैनिक आणि जनता घरी बसवेल. यापुढील काळात जो कोणी शिवसेनेशी गद्दारी करेल त्याला शिवसेना स्टाईलने जसेच तसे उत्तर शिवसैनिक देतील. आपण अजुन अधिक जोमाने काम करुन जिल्ह्यातील शिवसेना संघटना वाढवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करुया,” असे प्रतिपादन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केले.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हासंघटक संजय गवस, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, तालुका समन्वयक भगवान गवस, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, उपतालुकाप्रमुख सुभाष पांगम, बाबाजी देसाई, विभागप्रमुख संतोष मोरये, हर्षल सावंत, माजी जि.प.सदस्या संपदा देसाई महिला उपजिल्हासंघटक विनिता घाडी, उपविभागप्रमुख मिलिंद नाईक, युवासेना शहरप्रमुख श्याम खडपकर, युवासेना उपतालुकाप्रमुख संदेश गवस, सूचन कोरगावकर, रामदास मेस्त्री, आत्माराम नाईक, विजय जाधव, ओंकार कुलकर्णी, अरुण देसाई, हेमंत कर्पे, संजय नाईक, विवेक एकावडे, एल्विन लोबो आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जान्हवी सावंत यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. “शिवसेना जिंदाबाद”, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, ‘उद्धवसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है”, “जय भवानी जय शिवाजी,” अश्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!