*कोकण Express*
*रक्तदान हेच जीवदान …..ते वाचवते दुसऱ्यांचे प्राण….!*
*कणकवली संजीवनी हॉस्पिटल येथे २५ जून रोजी रक्तदान शिबिर…..!*
*कणकवली ः प्रतिनिधी:*
रोटारॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २५ जून २०२२ रोजी सकाळी ठीक १०:०० वा संजीवनी हॉस्पिटल कणकवली येथ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन रोटरी क्लब अध्यक्ष रोटेरीअन डॉ. विद्याधर तायशेटे व क्लब ऑफ कणकवली सेंट्रल चे अध्यक्ष रोट. श्रध्दा पाटकर यांनी केले आहे.
📞 *संपर्क:*
▪️ *मिहीर तांबे* – ७८७५३५८१५४
▪️ *निखिल पांगम* – ९४२१२५४९१७
वरील नंबर वर संपर्क करून आपली नावनोंदणी करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.