*कोकण Express*
*माननीय आमदार श्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त शेतकर्यांना मोफत खत वाटप उपक्रमाचा शुभारंभ*
दि. २३ जून २०२२ कणकवली तालुक्यातील नाटळ- सांगवे व हरकुळ मतदार संघातील २००० शेतकर्यांना मा जि प अध्यक्ष श्री संदेश ( गोट्या) सावंत व मा जि प अध्यक्षा सौ संजना संदेश सावंत यांच्या माध्यमातून येत्या ८ दिवसात मोफत खत वाटप करण्यात येणार असून या उपक्रमाची सुरवात माननीय आमदार श्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त नाटळ- सांगवे मतदार संघातील दारीस्ते गावातील १०० शेतकर्यांना खत वाटप करून करण्यात आली. कायम लोकहितकारक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असणार्या मा जि प अध्यक्ष श्री संदेश व सौ संजना सावंत यांनी हा उपक्रम राबवल्या बद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले
या प्रसंगी दारिस्ते सरपंच संजय सावंत, उपसरपंच सिताराम गुरव,सांगवे सरपंच मयुरी मुंज, दारिस्ते ग्रामपंचायत सदस्य संजय गांवकर, सुनिता पवार, वैष्णवी सुतार,विजया,बागवे, भाग्यश्री तांबे, तसेच चेअरमन प्रकाश साळसकर, विठ्ठल रासम, गोपी सुतार,नंदेश सावंत, महेश सुतार, सुरेश गांवकर,मदन गुरव , प्रकाश सावंत, अनिल गांवकर प्रकाश जाधव, जयसिंग गांवकर, मंगेश गुरव तसेच गावातील सर्व शेतकऱी उपस्थित होते