*कोकण Express*
*वैभववाडी तालुक्यातील सर्व शिवसैनिक हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच शिवसेना पक्षात काम करतील कोणी कुठे ही गेले तरी त्याचा शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही*
*शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
शिवसेना ही संघर्षातुन उभी राहिलेली आहे. काही वर्षांपूर्वी पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर नेत्यांनी शिवसेना औषधाला ही शिल्लक राहणार नाही असे सांगितले होते. त्यांची मागील 10 वर्षाच्या काळात काय परिस्थिती झाली हे राज्यातील व जिल्ह्यातील जनतेने जवळुन पाहिले आहे. शिवसेना सोडून जाणाऱ्यांना निष्ठावंत शिवसैनिक व जनता केव्हाही साथ देणार नाही. कारण हे सर्व शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहेत. माननीय उद्धव ठाकरे यांच्या सारखे संयमी व कार्यतत्पर नेतृत्व या महाराष्ट्राला आणि शिवसेना पक्षाला मिळाले सर्व शिवसैनिकांचे भाग्य आहे.*
*सिंधुदुर्गमधील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरूणभाई दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत. त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील शिवसैनिकाने अफवांवर विश्वास न ठेवता पक्षाचे काम सुरू ठेवावे. असे आवाहन शिवसेना वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केले