*कोकण Express*
*कै.श्रीधर नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद*
*१०० रक्तदात्यांनी केले रक्तदान*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कै.श्रीधर नाईक यांच्या 31 व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन
सुप्रसिद्ध आर्थोपॅडीक सर्जन डॉ. धनंजय रासम, तसेच हृदयरोग तज्ञ डॉ. धनेश रासम यांच्या हस्ते सनराईज टॉवर्समध्ये करण्यात आले.
श्रीधर नाईक यांच्या स्मृतिदिनी आयोजित रक्तदान शिबिराला दुपार पर्यंत १०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करत उत्स्फूर्त सहभाग घेतला.यावेळी नगरसेवक सुशांत नाईक,संकेत नाईक,बाळा भिसे, भास्कर राणे, डॉ.तुळशीराम रावराणे,बापू पारकर,बंडू राणे,
बाळू पारकर, रवींद्र मुसळे, प्रशांत वनस्कर, सिद्धेश राणे आदी उपस्थित होते.