*कोकण Express*
*कणकवली तालुक्यात आज ९ कोरोना पॉझिटिव्ह…*
*नांदगाव येथील एका प्रौढाचा मृत्यू : एकूण १६६९ बाधित*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यात आज ९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर नांदगाव येथील एका ५५ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात आत्तापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या १६६९ एवढी झाली आहे. तसेच ७१ एवढे सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.
आज आढळून आलेल्या कोरोना बाधितांमध्ये कणकवली शहर ४, तिवरे १, ओझरम १, नांदगाव १, तळेरे १ आणि हळवल येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.