*कोकण Express*
*धर्मवीर ने हिंदुत्व ,इतिहास व आत्मविश्वास जागविला आता मा.एकनाथजी शिंदे महाराष्ट्रात हिंदुत्वाचा इतिहास घडविणार*
*बाबा मोंडकर जिल्हा प्रवक्ते भाजपा*
*सिंधुदुर्ग*
महाविकास आघाडी च्या तिघाडी सरकार ने गेल्या तीन वर्षात जनतेच्या अपेक्षेवर पूर्ण पणे अपयशी ठरले असून महाराष्ट्राला उन्नतीला खीळ पोचविण्याचा कार्य या सरकारच्या माध्यमातून घडत आहे .मुख्यमंत्री श्री उद्धध्व ठाकरे यांनी अनैसर्गिक युती करून आपल्या स्वार्थासाठी हिंदुत्वाचा त्याग करून आपल्या स्वार्थासाठी शिवसेना आमदारांना चुकीची भूमिका घ्यायला लावली आताच झालेल्या राज्यसभा व विधानपरिषद निवडुकीत भाजपा च्या अतिरिक्त उमेदवार श्री धनंजयजी महाडिक व श्री प्रसादजी लाड च्या निकालातून ही नाराजी स्पष्ट झाली आहे या सर्व पाश्वभूमी वर धर्मवीर श्री आनंदजी दिघे यांचे शिष्य श्री एकनाथजी शिंदे यांनी शिवसेना आमदारांसोबत घेतलेली भूमिका धर्मवीर चित्रपटाने हिंदुत्व ,इतिहास व आत्मविश्वास जागविला असून आता येणाऱ्या काळात मा.एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्यात हिंदुत्वाचा इतिहास घडविणार हे नक्की आहे .