*कोकण Express*
*चोरट्यांचा पिसेकामते लिंगेश्वर आणि पावणाई देवी मंदिरातील दानपेटीवर डल्ला…*
बंद घरानंतर आता मंदिरातील दान पेट्यांवर चोरट्यांनी डल्ला मारण्यास सुरवात केला आहे. तालुक्यातील पिसेकामते येथील लिंगेश्वर व पावणाई देवी मंदिरात शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी कोयंदा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर फंडपेटी फोडून आतील रक्कम लंपास केली. फंडपेटी मंदिराच्या काही अंतरावर सापडली असून त्या शेजारी कुलूप टाकले होते. फंड पेटी फोडताना चोरांच्या हाताला जखम झाली आहे. त्याचे रक्त देखील मंदिरात पडले होते. तसेच चपलांचे ठसे देखील स्पष्ट दिसत होते.
मंदिरामध्ये दगडाची दानपेटी फोडल्यानंतर घटनास्थळी कणकवलीत पोलीस उपनिरीक्षक धनश्री पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, मनोज गुरव, भागवत, कदम दाखल झाले आहेत.