*कोकण Express*
*घोणसरी मधील १०वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच मा.सभापती श्री.मनोज रावराणे यांनी केला सत्कार*
*घोणसरी ः प्रतिनिधी*
घोणसरी येथील अ. वि.फडणीस माध्यमिक विद्यालयातील १० वी मध्ये प्रथम तीन आलेल्या प्रथम कु. हर्षाली देवलकर (९१%), कु. दिक्षा मराठे(८९.८०%), कु. आशिष पाटील(८८%) तर १२ वी मध्ये प्राची आयरे (८२.५०%),सानिका सुतार(८२.५०), अपेक्षा राणे(८१.८३), अनिसकुमार चव्हाण (७९.८३%) तसेच सतत ५ वर्षे घोणसरी हायस्कूल ची १००% निकालाची परंपरा राखल्याबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. भाई राणे यांचाही कल्पवृक्ष व भेटवस्तू देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मा.सभापती मनोज रावराणे यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे विशेष कौतुक केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करून योग्य तो पुढील शिक्षणाबाबतचा निर्णय घ्यावा.ज्यावेळी आमची मदत लागेल त्यावेळी आम्हाला हाक द्या आम्ही आपल्या वेळोवेळी पाठीशी राहु अशी ग्वाही दिली.यावेळी माजी सरपंच श्री. मॅक्सी पिंटो, हायस्कूल चे चेअरमन श्री भाई राणे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरपंच सौ.मृणाल पारकर,उपसरपंच श्री विलास मराठे,माजी सरपंच मॅक्सी पिंटो,हायस्कूल चे चेअरमन भाई राणे,तंटामुक्ती अध्यक्ष बाळा राणे,भाजपा तालुका उपाध्यक्ष छोटू पारकर,माजी उपसरपंच प्रसाद राणे, लवू सावंत,समीर राणे,दाजी गायकवाड, ग्रा.पं.सदस्या निकिता एकावडे,भाजपा बूथ अध्यक्ष संजय शिंदे,नितीन पारकर,मिहिर मराठे, दिवाकर कारेकर, अनिल राणे,गणेश एकावडे,प्रताप तापेकर, रत्नाकर पेडणेकर,राकेश घाडी,आदी पदाधिकारी कार्यकर्ते,विद्यार्थी पालक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.