*कोकण Express*
*मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा वाढदिवस कुडाळ मनसेकडून सामाजिक उपक्रमांनी साजरा*
*अणाव येथील अनाथ आश्रमास मदतकार्य, वृक्षलागवड,रक्तदान शिबिर व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या दि 14 जून 2022 रोजीचा जन्मदिवस कुडाळ मनसेने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा केला. दि 14 जून रोजी अणाव येथील आनंदाश्रमात वडीलधाऱ्या मंडळींच्या सहवासात लाडू वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करत आश्रमास तांदूळ,गहू,डाळ आदि साहित्य स्वरूपात मदत देखील केली.दि 15 रोजी रस्ता दुतर्फा वृक्षलागवड व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप उपक्रम राबविण्यात आला. यावेळी काही प्राथमिक शाळांच्या आवारात देखील शिक्षकांच्या विनंतीवरून आवळा,जांभळ,साग,सुपारी अशा विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली.तर दि 16 जून रोजी कुडाळ मराठा समाज हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 45 रक्तदात्यांनी उत्फुर्तपणे रक्तदान केले.उत्फुर्तपणे रक्तदान करणाऱ्या दात्यांक्सह उत्साह द्विगुणित व्हावा यासाठी रक्तदात्यांना मनसेकडून झाडे व छत्री भेट देवून सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,बाबल गावडे,उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे,अणाव सरपंच आपा मांजरेकर,अविनाश अणावकर,सत्यविजय कविटकर, प्रसिद्धी प्रमुख गुरू मर्गज,विभाग अध्यक्ष सुंदर गावडे, सचिन ठाकूर,शाखाध्यक्ष वैभव धुरी, कुडाळ शहर उपाध्यक्ष वैभव परब,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरवर्षी मनसेकडून या दिवशी वेगवेगळे सामाजिक उपक्रम हाती घेऊन हा दिवस साजरा केला जातो.कुडाळ मनसेच्या या सामाजिक उपक्रम राबवून आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीचे जिल्हावासीयांकडून कौतुक केले जात आहे.