शिवसेना वैभववाडी तालुक्याच्या वतीने संदेश पारकर यांचा सत्कार

शिवसेना वैभववाडी तालुक्याच्या वतीने संदेश पारकर यांचा सत्कार

*कोकण Express*

*शिवसेना वैभववाडी तालुक्याच्या वतीने संदेश पारकर यांचा सत्कार*

महाराष्ट्र शासनाच्या कोकण पर्यटन विकास महामंडळ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना नेते श्री.संदेश पारकर यांचा शिवसेना वैभववाडी तालुक्याच्या वतीने शिवसेना शाखेत सत्कार करण्यात आला. पर्यटनाच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्याच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन यावेळी संदेश पारकर यांनी दिले. वैभववाडी तालुक्यातील शिवसेना संघटनेचा आढावा यावेळी श्री.पारकर यांनी घेवुन मार्गदर्शन केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदु शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संभाजी रावराणे, माजी नगरसेवक रवींद्र रावराणे, खांबाळे उपसरपंच गणेश पवार, स्वप्निल रावराणे, शिवाजी राणे, दिपक गजोबर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!