*कोकण Express*
*दहावीच्या निकलातही कोकण विभागाची बाजी…*
*कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27%…*
*यंदाही मुलींनीच मारली बाजी…*
*मुंबई*
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या इयत्ता दहावीचा निकाल अखेर लागला आहे. यंदा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. या निकालात सालाबादप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.96 टक्के लागला आहे. तर राज्यात इयत्ता बारावीनंतर दहावीतही कोकणचा निकाल सर्वाधिक निकाल लागला आहे. तर विभागात नाशिकचा सर्वात कमी निकाल लागला आहे. या शिवाय राज्यातील 12 हजार 210 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूण 24 विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच ऑनलाईनच रिझल्ट डाऊनलोड करून घेता येणार आहे.