फोंडाघाट महाविद्यालयात प्लास्टिक मुक्ती अभियान संपन्न

फोंडाघाट महाविद्यालयात प्लास्टिक मुक्ती अभियान संपन्न

*कोकण Express*

*फोंडाघाट महाविद्यालयात प्लास्टिक मुक्ती अभियान संपन्न*

*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*

फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये राष्ट्रीय छात्र सेना विभागामार्फत प्लास्टिक मुक्ती अभियान राबवण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाच्या परिसरातील प्लास्टिक गोळा करण्यात आले. आजच्या काळात प्लास्टीक वापराचा झालेला अतिरेक व त्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी याविषयी प्रबोधन करण्यात आले. प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करणे शक्य नसले तरी किमान वापर केला तर प्लास्टिकपासून पर्यावरणावर होणाऱ्या परिणामापासून आपण वाचू शकतो. प्लास्टिक निर्माण करणे सोपे आहे परंतु ते नाहीसे करणे कठीण आहे. त्याचे विघटन होत असताना पर्यावरण विषारी होत असते. त्यामुळे प्लास्टिक वापरावर आळा हाच उपाय असल्याचे प्रबोधन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.

या उपक्रमाला छात्र सेनेचे सर्व विद्यार्थी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले, असोसिएट एन.सी.सी ऑफिसर लेफ्टनंट डॉ. राज ताडेराव व सहाय्यक डॉ. संतोष रायबोले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!