अविनाश पराडकर यांना भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवले# नुपूर शर्मा समर्थन नडले?

अविनाश पराडकर यांना भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवले# नुपूर शर्मा समर्थन नडले?

*कोकण Express*

*अविनाश पराडकर यांना भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवले# नुपूर शर्मा समर्थन नडले?*

*जिल्हाध्यक्ष पदी समीर प्रभुगावकर यांची नियुक्ती जाहीर# राजन तेली यांचा तातडीचा निर्णय*

भारतीय जनता पार्टीची बुलंद तोफ म्हणून ओळख असलेले भाजपा सिंधुदुर्गचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर यांना अखेर आज हटवण्यात आले आहे. जिल्हा कार्यकारिणी बैठकीत तातडीने त्यांच्या जागी कणकवलीचे समिर प्रभूलकर यांची नियुक्ती जाहिर करण्यात आले. अविनाश पराडकर हे गेले वर्षभर पक्षावर नाराज असून त्यांनी जाहीरपणे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यावर टीकादेखील केली होती. ती टीकाही नडल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते.

उपलब्ध माहितीनुसार राष्ट्रीय भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी महमंद पैगंबर यांच्यावर टीका केली होती. त्याचे पडसाद अनेक मुस्लिम देशात उमटले असल्याने अखेर भाजपाने त्यांचे निलंबन केले होते. पण त्याच नुपूर शर्माचे दोन दिवसांपूर्वी अविनाश पराडकर यांनी जाहीर समर्थन केले होते. नुपूर शर्मा यांचा रणमर्दानी फोटो ट्विट करत त्यांनी म्हंटले होते की नुपूर… काढलास जाळ आणि धूर! ५७ देशांना हादरणारा भुकंप तू… सत्याच्या चेहऱ्यावरील हिजाब हवेत उडवणारा थरकंप तू… हिंदुस्थानात लोकशाही आहे हे शिरच्छेदाचे फतवे काढणाऱ्या अवलादीने लक्षात घ्यावे.. आम्हालाही प्रत्युत्तरावर उतरायला लावू नये!” या त्यांच्या मतानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी त्यांना तडकाफडकी हटवले असून त्याठिकाणी प्रभुगावकर यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान पक्षासाठी केसेस अंगावर घेणारे भाजयुमो सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष राजवीर पाटील यांनीही सोशल मिडियापासुन फारकत घेत पक्षाशी यापुढे काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. यातून सिंधुदुर्ग भाजपात अंतर्गत आलबेल नसल्याचे उघड होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!