मा श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसे लॉटरी सेना अध्यक्ष श्री गणेश कदम,निलेश मेस्त्री यांच्या सौजन्याने आज बिजलीनगर फोंडा घाट येथे सोलर लाईटचे लोकार्पण

मा श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसे लॉटरी सेना अध्यक्ष श्री गणेश कदम,निलेश मेस्त्री यांच्या सौजन्याने आज बिजलीनगर फोंडा घाट येथे सोलर लाईटचे लोकार्पण

*कोकण Express*

*मा श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसे लॉटरी सेना अध्यक्ष श्री गणेश कदम,निलेश मेस्त्री यांच्या सौजन्याने आज बिजलीनगर फोंडा घाट येथे सोलर लाईटचे लोकार्पण..*

*कणकवली ः संंजना हळदिवे*

सन्मा.राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व युवा नेते अमित साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ,सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर, चंद्रकांत वंदे,दया मेस्त्री, दत्ताराम बीडवडकर, नितिन पवार, सूर्यकांत मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनसे लॉटरी सेना अध्यक्ष श्री गणेश कदम साहेब यांच्या सौजन्याने निलेश मेस्त्री यांनी आज बिजलीनगर फोंडाघाट येथे सोलर लाईटचे लोकार्पण केले. तेव्हा ग्रामस्थ,पदाधिकारी, कार्यक्रमास उपस्थित होते.या विजदरवाढ व लोडशेडिंगमुळे त्रस्त जनतेस गणेश कदम यांच्या सोलर लाईट उपक्रमाचा नक्कीच फायदा होत आहे असे उपस्थित लोकांनी सांगितले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य पक्षाच्या नेत्यांनी पण असा उपक्रम राबवावा असे सिंधुदुर्ग वासीय अपेक्षा करित आहेत. यावेळी उपस्थित लोकांनी राजसाहेब ठाकरे, गणेश कदम व नीलेश मेस्त्री यांचे आभार मानले.


यावेळी कणकवली उपतालुका अध्यक्ष अनंत आचरेकर,फोंडाघाट शहर अध्यक्ष प्रसाद हळदिवे,कोळोशी विभाग अध्यक्ष बाळा अमृते,संजना हळदीवे, संजय हळदिवे,महाराष्ट्र सैनिक अनिकेत तर्फे,दिगंबर शिवगण,राजा पटेल,सिद्धेश मोंडकर,रोहित झोरे,सुशांत तेली,दर्वेश परब,आनंद गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्व ग्रामस्थांनी राजसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!