*कोकण Express*
*शिवसेना वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्या हस्ते सडुरे तांबळघाटी नळ योजनेचे उद्घाटन*
*सडुरे तांबळघाटी नळ योजनेचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या हस्ते*
वैभववाडी ः प्रतिनिधी*
सडुरे ग्रामपंचायतीच्या 15 वा वित्त आयोग निधीतुन सडुरे तांबळघाटी ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची खुप मोठी समस्या होती. त्याची दखल घेऊन सडुरे ग्रामपंचायतीने या वाडीसाठी 15 वा वित्त आयोग निधीमधून नवीन टाकी व पाईपलाईनसाठी 8 लाख रूपयेचा निधी खर्च करण्यात आला. हे काम नुकतेच पूर्ण झाले त्यामुळे या वाडीतील सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.*
यावेळी स्थानिक ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी बोडेकर, राजेश बोडेकर, रमेश शेळके, दीपक पवार, गणेश राऊत, ठेकेदार बावदाणे, निनाद विखाळे, संतोष बोडेकर, शाहू बोडेकर, सुनिल बोडेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.