तळेरे येथील शैक्षणिक संकुलाच्या दरम्यान महामार्गाच्या लगत लोखंडी बॅरिकेट्स बसविण्याचे कामाला अखेर सुरूवात

तळेरे येथील शैक्षणिक संकुलाच्या दरम्यान महामार्गाच्या लगत लोखंडी बॅरिकेट्स बसविण्याचे कामाला अखेर सुरूवात

*कोकण Express*

*तळेरे येथील शैक्षणिक संकुलाच्या दरम्यान महामार्गाच्या लगत लोखंडी बॅरिकेट्स बसविण्याचे कामाला अखेर सुरूवात*

*सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांच्या पाठपुराव्याला यश*

*कासार्डे:संजयभोसले*

तळेरे येथील शैक्षणिक संकुलाच्या दरम्यान महामार्गाच्या लगत लोखंडी बॅरिकेट्स बसविण्याच्या कामाला अखेर सुरूवात करण्यात आली आहे.यासाठी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कणकवली तालुका उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

तळेरे येथील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या शैक्षणिक संकुलांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सहज, सुलभ व सुरक्षितपणे महामार्गाच्या कडेने ये – जा करता यावी व महामार्ग ओलांडता यावा, तसेच सदर ठिकाणी महामार्गावर कोणताही रस्ते – वाहन अपघात घडल्यास त्याची जरा देखील झळ पादचारी विद्यार्थ्यांना बसू नये याकरिता संविधानिक लोकशाही मार्गाने केलेल्या अथक प्रयत्न व त्याअनुषंगाने उभारलेल्या न्यायिक लढ्यास दीर्घ काळाने का होईना पूर्णतः यश आलेले आहे.

किंबहुना त्याची सुरुवात म्हणून सदर शैक्षणिक संकुलाच्या दरम्यान महामार्गाच्या लगत लोखंडी बॅरिकेट्स बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच लवकरच सदर ठिकाणी महामार्गावर पादचारी पूल उभारणीचे देखील काम सुरू करण्यात येणार आहे.यासाठी
राजेश जाधव यांनी महामार्गाचे काम सुरु होण्यापूर्वी पासून सुरुवातीपासून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.त्याचबरोबर जन आंदोलन उभारुन प्रसंगी आमरण उपोषण देखील केले होते.तसेच संबंधित अधिकारी वर्गाकडे पाठपुरावा सुरू होता.या त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

सदर शैक्षणिक संकुलाच्या दरम्यान महामार्गाच्या लगत लोखंडी बॅरिकेट्स बसविण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली आहे.शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेचा दृष्टीने हा प्रश्न ऐरणीवरती होता.या महत्त्वाच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!