नूतन गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांचे मनसेकडून स्वागत.

नूतन गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांचे मनसेकडून स्वागत.

*कोकण Express*

*नूतन गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांचे मनसेकडून स्वागत..!*

*मालवण ः प्रतिनिधी*

नूतन गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांचे तालुका मनसेकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांची बदली झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर आप्पासाहेब गुजर सोमवारी रुजु झाले.

सोलापूर अकलूज हे मूळ गाव असलेले आप्पासाहेब गुजर यांनी कृषी अधिकारी म्हणून पुणे जिल्ह्यात बारामती दौंड येथे १८ वर्षे सेवा बजावली. त्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून मावळ, मुळशी, हवेली या पंचायत समिती ठिकाणी त्यांनी नऊ वर्षे कार्यभार पाहिला. त्यांची पदोन्नतीने मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी पदी बढती नियुक्ती देण्यात आली आहे.त्यांना भावी वाटचालीस तालुका मनसेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी,मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर,तालुका सचिव विल्सन गिरकर,शहरअध्यक्षा भारती वाघ,उपशहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर,आबा आडकर,राजेश कुडाळकर,मंदार आजगावंकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!