मेडिकल व्यवसायिकावर प्राणघातक हल्ला

मेडिकल व्यवसायिकावर प्राणघातक हल्ला

*कोकण Express*

*मेडिकल व्यवसायिकावर प्राणघातक हल्ला…!*

*कासार्डेतील थरकाप उडवणारा प्रकार…!*

*पोलिसांची घटनास्थळी धाव…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे मुंबई गोवा महामार्गावरील कासार्डे तिठ्ठा ओव्हर ब्रीजवर तळेरे येथील मेडिकल व्यावसायिक जगदीश डंबे,रा.कासार्डे जांभळगाव याच्यावर पहाटे पाचच्या सुमारास माॅर्निग वाॅकला गेले असताना कासार्डेहून तळेरेच्या दिशेने जाणा-या लेनवर दुचाकीवरून तीन अज्ञातांकडून चाकूचा धाक दाखवून पैशाची मागणी करत प्राणघातक हल्ला केला. यात श्री. डंबे याच्या नाकावर ठोसा लावत जखमी केले. तर हातातील सोन्याची अंगठी व पैसै हुसकावण्यासाठी पोटात सुरा घुसण्याचा प्रयत्न केला मात्र डंबे यानी प्रतिकार केला तर आरडाओरडा केल्यानतंर दुचाकीवरून आलेले ते तीन इसम सुमारे बत्तीस हजाराचा मोबाईल घेऊन कणकवलीच्या दिशेने पसार झाले.या हल्ल्यात डंबे नाकावर जखम झाल्याने रक्तबंबाळ झाले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत जखमी डंबे याना कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करत प्रथमिक उपचार केले. यातनंर कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल होत माहिती घेऊन अधिक तपास करीत असून पहाटे झालेल्या थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे घबराट निर्माण होत हल्ल्यामुळे महामार्ग पुन्हा एकदा हादरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!