12 वीच्या परीक्षेत प्रा.राजाराम परब यांच्या परफेक्ट अकॅडमीची  दीक्षा तोंडवलकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम

12 वीच्या परीक्षेत प्रा.राजाराम परब यांच्या परफेक्ट अकॅडमीची दीक्षा तोंडवलकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम

*कोकण Express*

*12 वीच्या परीक्षेत प्रा.राजाराम परब यांच्या परफेक्ट अकॅडमीची

दीक्षा तोंडवलकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम*

*सिंधुदुर्ग*

बारावी परीक्षेच्या निकालामध्ये सलग ११ वर्षे कोकण विभाग अव्वल राहिला आहे. यंदाच्या निकालात सिंधुदुर्ग जिल्ह्याची टक्केवारी ९८.७५ टक्के आहे. तर रत्नागिरीचा निकाल ९६.३९ टक्के एवढा लागला आहे. सिंधुदुर्गात वैभववाडी तालुका निकालात आघाडीवर असून या तालुक्याचा निकाल शंभर टक्के लागला आहे. पाठोपाठ वेंगुर्ले तालुक्याचा निकाल वेंगुर्ले ९९.६४ टक्के आणि मालवण तालुक्याचा निकाल वेंगुर्ले ९९.२४ टक्के एवढा लागला आहे. इतर तालुक्यांमध्ये कणकवली ९८.९१ टक्के, देवगड ९८.६३ टक्के, सावंतवाडी ९८.५९ टक्के, दोडामार्ग ९८.११ टक्के आणिकुडाळ ९८.०४ अशी निकालाची टक्केवारी आहे. सिंधुदुर्गात यंदा १० हजार ३२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १० हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान परफेक्ट अकॅडमीची विद्यार्थीनी, वेंगुर्ला तालुक्यातील खर्डेकर महाविद्यालयाची विज्ञान शाखेत शिकणारी दीक्षा तोंडवलकर हिने 96.50 टक्के गुण मिळवत पटकवला. तर द्वितीय क्रमांक सावंतवाडी तालुक्यातील आरपीडीची कॉमर्स शाखेची विद्यार्थिनी गायत्री कोरगावकर हिने 95.17 टक्के गुण मिळवत तर तृतीय क्रमांक कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या वाणिज्य शाखेतील विश्वजा नाईक हिने 95 टक्के गुण मिळवित प्राप्त केलाय.

वैभववाडी : तालुक्यातील कै. हेमंत केशव रावराणे विद्यालयाची चित्रा प्रदीप प्रभु ही विद्यार्थीनी 90 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे. तर नेर्ले विद्यालयाची दिक्षा जगन्नाथ मोरे ही ८९.१७ टक्के गुण मिळवून व्दितीय आली आहे. तर तृतीय क्रमांक सायली सुरेश जांभवडेकर हिने पटकाविला आहे.

वेंगुर्ले : तालुक्यात प्रथम येण्याचा मान परफेक्ट अकॅडमीची विद्यार्थीनी खर्डेकर महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकणारी विद्यार्थिनी दीक्षा तोंडवलकर हिला मिळाला. विज्ञान शाखेतून दिक्षा तोंडवलकर ५७९ गुण (९६.५० टक्के) मिळवत प्रथम, द्वितीय राजवीर देसाई ५५९ गुण (९३.१७ टक्के) तृतीय अजिंक्य डिसोजा ५५० गुण (९१.६७ टक्के) यांनी पटकवला आहे.

मालवण : टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेची विद्यार्थिनी हर्षिता ढोके ही ५३९ गुण मिळवित तालुक्यात प्रथम, न्यू इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची दीपिका चव्हाण ही ५२३ गुण मिळवून द्वितीय तर टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा अतिकुरेहमान अंसारी ५२२ गुण मिळवून तृतीय आला आहे. तालुक्यातील सात कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

सावंतवाडी : तालुक्यातील आरपीडी कॉमर्स शाखेची विद्यार्थिनी गायत्री कोरगावकर ही 95.17 टक्के गुण मिळवून तालुक्यात पहिली, मिलग्रीस ज्युनिअर कॉलेजच्या कॉमर्स शाखेची सॅनिता रॉड्रिग्ज 94. 83 टक्के गुण मिळवून दुसरी तर राणी पार्वतीदेवी जुनियर कॉलेज कला शाखेची विद्यार्थिनी वैष्णवी डेगवेकर 93. 83 तिसरी आली आहे.

देवगड : वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी साक्षी सचिन राणे हिने 90.17 गुण मिळवत देवगड महाविद्यालयाच्या चारही शाखातून प्रथम येण्याचा मान मिळविला. पूर्वा संजय बापट हिने वाणिज्य शाखेतून ८८.१७% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर तृतीय क्रमांक फणसगाव महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी सौंदर्या संतोष वाडेकर हिने ८७.३३% गुण मिळवलाय.

कुडाळ : कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या वाणिज्य शाखेतील विश्वजा नाईक हिने 95 टक्के गुण मिळवित तालुक्यात प्रथम आली. तर याच कॉलेजच्या वाणिज्य शाखेतीलच मृण्मयी नार्वेकर (93.33) हिचा द्वितीय व तृतीय क्रमांक उत्कर्षा ठाकूर (92.83) हिचा आला.

दोडामार्ग : दोडामार्ग जुनियर कॉलेज वाणिज्य शाखेटून 87.33% मिळवत प्रथम क्रमांक कुमारी प्राची प्रमोद शेटवे, कला शाखेतून सोनल पुरूषोत्तम गवस 83 टक्के मिळवत द्वितीय, तर विज्ञान शाखेटून दशरथ राजगोळकर 80.16% तुतीय क्रमांक प्राप्त केला.

कणकवली : तालुक्यामध्ये प्रथम स्नेहल राजेंद्र परब 93.17, मृण्मयी विजयानंद गायकवाड 93.17 व आशिष भोसले 93.17 यांनी संयुक्त प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. द्वितीय अमृता अरविंद चोपडे ( 92.50 ) हिने तर तृतीय क्रमांक प्राची अनिल तायशेटे 92.33 गुण मिळवून यशस्वी झाले आहेत.

महाराष्ट्रामध्ये यंदा ही कोकण बोर्डाने आपली यशस्वी परंपरा अबाधित राखली असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हावासियांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!