फोंडाघाट- नवीन कुर्ली येथे विकास कामांचा शुभारंभ

फोंडाघाट- नवीन कुर्ली येथे विकास कामांचा शुभारंभ

*कोकण Express*

*फोंडाघाट- नवीन कुर्ली येथे विकास कामांचा शुभारंभ*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाने दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी मा.जिल्हाधिकारी यांच्या कार्यालया समोर सलग दहा दिवस विविध प्रलंबित मागण्या संदर्भात उपोषण केले होते.

प्रकल्पग्रस्त, जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन अधिकारी यांच्या बैठकीत लेखी आश्वासन दिल्यानंतर तब्बल दहा दिवसानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते, आणि त्यानंतर नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाने मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करून नवीन कुर्ली पुनर्वसन वसाहतीत विविध विकास कामे मंजुर करून घेतली त्यापैकी “नविन कुर्ली येथे स्ट्रीट लाईट बसविणे” या कामाचा शुभारंभ आज नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष मा.राजेंद्र कोलते यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

त्या प्रसंगी पाटबंधारे विभागाचे श्री गणेश आपकरे, ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष सुरज तावडे, खजिनदार रविंद्र नवाळे, हरेश पाटील, नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत दळवी, कृष्णा परब, अमित दळवी, बाळकृष्ण चव्हाण, शिवराम पोवार, रमेश पाटील ,अनंत दळवी, एकनाथ चव्हाण वसंत कदम, शिवाजी चव्हाण, शांताराम साळसकर,अरुण पोवार, गणेश दळवी , विजय परब, दत्ताराम साळसकर, चंद्रकांत मर्गज, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!