ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटचा एच. एस. सी. चा निकाल ९९.६० टक्के

ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटचा एच. एस. सी. चा निकाल ९९.६० टक्के

*कोकण Express*

*ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटचा एच. एस. सी. चा निकाल ९९.६० टक्के*

*२५१ पैकी २५० विद्यार्थी उत्तीर्ण*

*कणकवली ः प्रतिनिधी*

ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स, व्होकेशनल अँड सायन्स फोंडाघाटचा मार्च / एप्रिल २०२२ च्या एच.एस.सी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दि. ०८/०६/२०२२ रोजी जाहिर झाला असून या परिक्षेस प्रविष्ठ झालेल्या २५१ विद्यार्थ्यांपैकी २५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची एकूण टक्केवारी ९९.६० एवढी आहे. प्रशालेने यावर्षी सुध्दा उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.

आर्टस् शाखेचा निकाल ९८.२७% लागला असून सुचिता यशवंत कदम हिने ८०.००% गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर सोनाली विकास गुरव हिने ७७.८३% आणि पायल दिनकर सापळे हिने ७४.६७% गुण प्राप्त करत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. कॉमर्स शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून सुरेश संतोष गवळी ८४.१७% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तर शुभम नामदेव लाड ८२.००% आणि रुचिता राजाराम बालेघाटकर ८१.१७% गुण मिळावून अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. व्होकेशनल विभागाचा निकाल १००% लागला असून गायत्री विजय वाळवे ८३.१७% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर शिल्पा संतोष गुंडये ८२.८३% आणि साक्षी सुभाष मांजलकर ८२.१७% गुण मिळवत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला असून ऋतुजा बाबुराव लांबोरे हिने ८२.६७% गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर सुशांत राजेंद्र कुरणे ८२.१७% आणि अपेक्षा अनंत राणे ८१.८३% गुण प्राप्त करत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांकडून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!