बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सांगवे भाजपच्यावतीने अभिवादन

*कोकण Express*

*बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सांगवे भाजपच्यावतीने अभिवादन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिन आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला पं. स.-माजी.सभापती श्री. सुरेश सावंत, माजी.जि. प.अध्यक्ष -संजना सावंत तसेच भाजप चे जिल्हाध्यक्ष- राजन तेली उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुसूचित जाती भाजप मोर्चाचे कार्यकर्ते वरवडेकर यांनी सूत्रसंचालन केले , तसेच ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगवे बौद्ध विकास मंडळाचे सचिव अशोक कांबळे यांनी केले तरी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांगवे बौद्ध विकास मंडळाचे कार्याध्यक्ष व सांगवे गावचे माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष चंद्ररतन कांबळे यांनी केले ,सदर कार्यक्रमाला आंबेडकर नगरातील सर्व बंधुबघिणी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!