*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. विष्णू फुलझेले यांची नेमणूक*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे डॉ. विष्णू फुलझेले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या तज्ञ समितीकडून डॉ.विष्णू फुलझेले यांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
डॉ. विष्णू फुलझेले यांनी 34 वर्षे अध्यापन केले असून 28 वर्षे त्यांनी करंदीकर महाविद्यालय डहाणू जि. पालघर येथे वाणिज्य विभाग प्रमुख म्हणून तर पाच वर्षे सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय, शहापूर जिल्हा ठाणे येथे प्राचार्य म्हणून काम केले आहे.
डाॅ. विष्णू फुलझेले यांनी एम.कॉम., एम.बी.ए., एल. एल.बी.,जी.डी.सी. आणि ए., एम. ए., एम. फिल. पीएच.डी. अशी शैक्षणिक अहर्ता प्राप्त केली असून ‘ठाणे जिल्ह्यातील आय.एस.ओ. 9000 च्या विशेष संदर्भान्वये लघु उद्योगांचा अभ्यास’ असा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.
मूळ कामठी, जिल्हा नागपूर येथील डॉ.विष्णू फुलझेले यांनी ५१ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये संशोधन निबंध प्रसिद्ध केले असून चार पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. एकूण 80 राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेऊन 11 आंतरराष्ट्रीय तसेच मुंबई विद्यापीठ व राष्ट्रीय स्तरावर 20 परिषदा/ चरचासञांचे आयोजन सरांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे.
त्यांच्या या नियुक्तीमुळे फोंडाघाट महाविद्यालय प्रगतीपथावर जाईल असा आशावाद व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या नियुक्तीचे स्वागत फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. सुभाष सावंत, सचीव मा. श्री. चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार मा.श्री.आनंद मर्ये तसेच सर्व संचालक मंडळ व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य यांनी स्वागत केले आहे.