*कोकण Express*
*शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तळेरे येथे पुस्तक प्रदर्शन*
*तळेरे येथील सुनिल तळेकर वाचनालयाचा स्तुत्य उपक्रम*
*कासार्डे :संजय भोसले*
छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिनानिमीत्त छ. शिवाजी महाराजांवरील विविध पुस्तकांचे प्रदर्शन तळेरे येथील स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयात आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला विविध मुलांनी भेट दिली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष दादा वरुणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, चंद्रकांत तळेकर, तळेरे उपसरपंच दिनेश मुद्रस, माजी उपसरपंच दिपक नांदलसकर, ग्रामसेवक युवराज बोराडे, प्रवीण वरुणकर, हेमंत महाडिक, शैलेश सुर्वे, सौ. साक्षी तळेकर आदी उपस्थित होते.
शिवरायांचं चरित्र असलेले ग्रंथ आणि पुस्तकाचे प्रदर्शन यावेळी मांडण्यात आले होते. छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करुन ते यशस्वीपणे करुन दाखविले, तशाच प्रकारे आपणही आपले वाचनालय भविष्यात आदर्शवत करुया, असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी दादा वरुणकर, विनय पावसकर, सौ. श्रावणी मदभावे यांनी मनोगत व्यक्ट केले.