मोदी सरकारने दिव्यांगासाठी महत्वपूर्ण कायदे करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व हक्काचे संरक्षण मिळण्यासाठी मदत केली

मोदी सरकारने दिव्यांगासाठी महत्वपूर्ण कायदे करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व हक्काचे संरक्षण मिळण्यासाठी मदत केली

*कोकण Express*

*मोदी सरकारने दिव्यांगासाठी महत्वपूर्ण कायदे करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व हक्काचे संरक्षण मिळण्यासाठी मदत केली* 

*अनिल शिंगाडे , जिल्हा संयोजक , भाजपा दिंव्याग विकास आघाडी – सिंधुदुर्ग*

*भाजपा दिंव्याग विकास आघाडी , सिंधुदुर्ग च्या वतीने दिव्यांगासाठी मोदी सरकारच्या योजनांची माहिती*

*पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या केंद्रातील सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपा दिंव्याग विकास आघाडी चा उपक्रम*

भाजपा दिंव्याग विकास आघाडी सिंधुदुर्ग च्या वतीने मोदी सरकारच्या यशस्वी अष्ठवर्षपुर्ती निमीत्त दिव्यांगासाठी मोदी सरकारने केलेले भरीव काम व नवनवीन योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
यावेळी माहिती देताना अनिल शिंगाडे यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे सर्व दिव्यांगांच्या वतीने आभार मानले , कारण ” *दिंव्याग* ” हा शब्दच मुळात मोदीजींनी आणला , त्यामुळे अपंगांना सार्वजनिक जीवनात ताठ मानेने उभे रहाता आले . त्याचप्रमाणे यापूर्वी फक्त मतिमंद , शारीरिक अपंग , अंध व कर्णबधीर असे चारच अपंगत्वाच्या मुलांनाच प्रमाणपत्र मिळत होते परंतु पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी २८ एप्रिल २०१६ रोजी ऑटीस्टीक मुलांनाही असे प्रमाणपत्र देण्यात यावे असे जाहीर केले . तसेच दिव्यांगांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी नॅशनल हॅडीकॅप फाईनंस अॅड डेव्हलपमेंट कार्पोरेशन कडुन ५ लाख रुपयांपर्यंत बिझनेस लोन सुरू केले . दिव्यांगजनासाठी शादी विवाह प्रोस्ताहन योजना सुरू केली .आपल्या दिव्यांग बंधू-भगिनींबद्दल अत्यंत सहानुभूती दाखवून, सरकारने दि राईट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज विधेयक २०१६ मंजूर करून कायदेशीर चौकट मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. २१ अपंगांना मान्यता देऊन, पूर्वीच्या ७ मध्ये मोठी सुधारणा करून, सरकारने अपंगत्वावर उपचार केले आहेत. काळानुसार गतिमान संकल्पना म्हणून. भाषण आणि भाषिक अपंगत्वाची भर घातली गेली ज्याकडे यापूर्वी लक्ष दिले गेले नव्हते, त्यामुळे अधिकाधिक दिव्यांग लोकांना सरकारच्या कार्यक्रमांच्या कक्षेत आणले जाते.

महत्त्वाचे म्हणजे, दिव्यांग मुलांसाठी (६-१८ वर्षे) मोफत शिक्षणाचा अधिकार हा आणखी एक मोठा विकास आहे. त्यानंतर, उच्च शिक्षण संस्थांमध्ये 4% जागांचे आरक्षण देण्याव्यतिरिक्त, दिव्यांगांवर केलेल्या गुन्ह्यांसाठी दंडाची तरतूद करण्यात आली आहे.तसेच मोदी सरकारने अंत्योदय योजनेमध्ये बदल करुन प्रत्येक दिव्यांग कुटुंबाला प्रती महीना ३५ कीलो धान्य मंजूर केले . त्याचप्रमाणे दिव्यांगासाठी नवीन पेंशन योजना सुरू केली .२७ डिसेंबर २०१६ ला मोदी सरकारने दिव्यांगासाठी महत्वपूर्ण कायदा केला व पुर्वीच्या कायद्यात बदल व सुधारणा केली . त्यामुळे दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच हक्काचे संरक्षण मिळण्यासाठी मदत झाली .
यावेळी भाजपा दिंव्याग विकास आघाडी चे जिल्हा सरचिटणीस शामसुंदर लोट , सदानंद पावले , उदय भोगावकर , विठ्ठल शिंगाडे ,बाबुराव गावडे , दिक्षा तेली , शेखर आळवे , सविता गावडे , सेजल आळवे , मारुती शेटये , सुवर्णा वरक , प्रीया सावंत , रीतेश तेली , जोस्ना राणे , तन्मयी तेली , सरीता लोके , विजय गोसावी , सुधीर चव्हाण , वृषाली कांबळे , संगीता पवार , प्रीतम मठकर , प्रशांत कदम इत्यादी दिंव्यांग उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!