*कोकण Express*
*पथनाट्य,फुगड्यांसह प्रभातफेरीने तळेरेत विद्यार्थ्यांनी साजरा केला अनोख्या पद्धतीने जागतिक पर्यावरण दिन*
*कासार्डे ः संजय भोसले*
काल ५जून जागतिक पर्यावरण दिन कणकवली तालुक्यातील तळेरेतील ‘प्रज्ञांगण’ मधील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशपरिधान करीत तसेच फुगड्या घालून, ढोलवादन करीत पर्यावरण पुरक, व्यसनमुक्ती आणि प्लास्टिक मुक्तीच्या जनजागृती पर घोषणा देत तसेच पथनाट्यव्दारे जनजागृती करीत जागतिक पर्यावरण दिन अगदी अनोख्या पद्धतीने हा साजरा केला आहे.
डाॅ.अनिल नेरूरकर प्ररित तंबाखू प्रतिबंध अभियानकडून आणि श्रावणी कम्प्युटर तळेरेचे सुमारे ७५ पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीत वैभववाडी,देवगड व कणकवली या तीन तालुक्यातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. या रॅलीचे उद्घाटन डाॅ.अभिजित कणसे यांच्या हस्ते करण्यात आले. रॅलीत तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे शाखेच्या संचालिका सौ.श्रावणी मदभावे,प्रज्ञांगणचे संचालक श्री. सतिश मदभावे,प.स. सदस्य तथा कोकण भजन सम्राट प्रकाश पारकर,तळेरेचे माजी सरपंच प्रविण वरुणकर, पत्रकार प्रमोद कोयंडे, दत्तात्रय मारकड, सामाजिक कार्यकर्ते निलेश तळेकर व अन्य मान्यवर सहभागी झाले होते.
बॅक ऑफ इंडिया तळेरे येथील श्रावणी कम्प्युटर सेंटर पासुन रॅलीचा प्रारंभ झाला ते तळेरे मुख्य बाजारपेठतून -नामदेव आळी मार्गे तळेरे बसस्थानक आणि रिक्षा सहा सिटर स्टॅडवरून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गे प्रज्ञांगण येथे येवून विसावली.
या दरम्यान विद्यार्थ्यांनी
पर्यावरण वाचवा -प्राण वाचवा, पर्यावरण वाचवा भविष्य घडवा, कापडी पिशवी घरोघरी- पर्यावरणाचे रक्षणकरी , काम करा लाख मोलाचे- निसर्गाच्या संवर्धनाचे, तसेच तंबाखू विरोध दिनानिमित्त व्यसनमुक्तीवर आधारित प्रबोधनात्मक दिलेल्या घोषणांनी परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता.या रॅलीचे खास आकर्षण व्यसनमुक्तीचा संदेश देणारा चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
कु.आकांक्षा जठार(गोवळ),
स्मितेश पाष्टे(साळिस्ते ),
कु.सानिका मारकड
(कासार्डे),कु.दिक्षा कोकरे
(गोवळ),कु.साक्षी मण्यार(नडगिवे),कु.ऋतुजा पांचाळ (शेर्पे),
बुध्दिराज खरबे(पेंढारी),सुरज खांडेकर(पोंभुर्ले),आदीं विद्यार्थ्यांनी बाजारपेठ, बसस्थानकात तसेच सहासिटर स्टॅड,व इतर विविध ठिकाणी उत्कृष्ट असे प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले.
दरम्यान विद्यार्थ्यानी पर्यावरण व तंबाखू विरोधी व्यसनमुक्ती वर आधारित पथनाट्य,फुगडी गीते,काव्यवाचन,ढोलवादनासारख्या अनेक बहारदार कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
तर ढोलपथकात कु.शिल्पा शेगावे (दारुम), प्राची पाळेकर (कासार्डे), ईशा झोरे (फणसगाव), विराज पांचाळ नेहा पांचाळ ,साईल सोमले, गौरव सोमले, (सर्व सोमलेवाडी),स्मितेश पाष्टे(साळिस्ते ),
कु.सानिका मारकड
(कासार्डे),कु.दिक्षा कोकरे
(गोवळ),कु.साक्षी मन्यार(नडगिवे),कु.ऋतुजा पांचाळ (शेर्पे),
बुध्दिराज खरबे(पेंढारी),
सुरज खांडेकर(पोंभुर्ले), कु.सिद्धी प्रभूपेंढारकर (पोंभुर्ले), सानिका पवार (कासार्डे)आदी विद्यार्थ्यांनी बहारदार ढोल व ताशावादन करून रॅलीला रंगत आणली.