कोलगाव येथे शिवसेनेच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ

*कोकण Express*

*कोलगाव येथे शिवसेनेच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ*

*जिल्हयाच्या विकासासाठी शिवसेनेच्या पाठीशी राहा…*

*आमदार दीपक केसरकर*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

शिवसेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालय सारखा महत्त्वाचे हॉस्पिटल जाहीर करून,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील लोकांना दिलासा दिला आहे.त्यामुळे तेथील जनतेने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे,असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष तथा सावंतवाडी तालुका निरीक्षक श्री सतिश सावंत,जिल्हाप्रमुख श्री संजय पडते व महिला जिल्हा संघटक सौ जान्हवी सावंत यांच्या उपस्थितीत सभासद नोंदणी शुभारंभ केेेला.यावेळी मार्गदर्शन करतेवेळी केसरकर यांनी सर्वाधिक भाताला दर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. हे आपल्या पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे आपल्या जिल्ह्यावर असलेल्या प्रेमामुळे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून त्यासाठी ९६६ कोटी रुपये मंजूर केले,अशा पक्षप्रमुख ठाकरे यांचे हात अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून झालेली विकासकामे लोकांच्या निदर्शनास आणून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करा,असे आवाहन केले.तर निरीक्षक तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सावंत यांनी आपण नेहमीच चांगल्या गोष्टीला साथ देतो आणि शेतकऱ्यांचा कष्टाचे पैसे हे कोणाच्या दडपणाखाली चुकीच्या पद्धतीने वापरले जाऊन बॅंकेचे नुकसान होऊ नये यासाठीच शिवसेनेत आलो आणि याठिकाणी लोकांच्या हिताचे निर्णय घेतले जातात कुठलंही दडपण नाही त्यामुळे अधिक जोमाने काम करण्याचा आनंद मिळतो.आज सभासद नोंदणीच्या निमित्ताने आपल्याला लोकांच्या गाठीभेटी घेण्याची संधी आली आहे तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन सभासद नोंदणी करून शिवसैनिक बनवा ती आपली पक्षाची ताकद असेल आणि भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत आपण विजय संपादन करून दडपशाही करून अन्याय करणाऱ्यांना जिल्ह्यातून हद्दपार करु शकतो.तर जिल्हाप्रमुख संजय पडते व महिला जिल्हा संघटक सौ जान्हवी सावंत यांनी संघटनात्मक पद्धतीने कशा पद्धतीने काम करून जास्तीत जास्त सभासद नोंदणी होऊ शकतात याचे मार्गदर्शन केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, चंद्रकांत कासार, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, महिला तालुका संघटक अपर्णा कोठावळे, उपतालुका प्रमुख बाळू माळकर, महिला उपतालुका संघटक चित्रा धुरी, आदी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!