*कोकण Express*
*शिवसेना व युवासेना मार्फत दिगवळे सुतारवाडी येथे भात बियाणेचे वाटप*
*माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री. सतिशजी सावंत यांच्या हस्ते वाटप*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेना व युवासेना मार्फत दिगवळे सुतारवाडी येथे भात बियाणेचे वाटप माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री. सतिशजी सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी सतिश सावंत यांनी शेतकऱ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. यावेळी नाटळ विभागप्रमुख आनंद आचरेकर, युवा सेना कणकवली उपतालुकाप्रमुख उत्तम लोके, युवा सेना प्रमुख संतोष सावंत, शाखाप्रमुख शामसुंदर जाधव,रुपेश गावकर, संजय आचरेकर, माजी सरपंच दीपक मेस्त्री, माजी ग्रा. पं. सदस्य बबन मेस्त्री, धोंडी गावडे, संतोष वाळवे, दीपक मठकर व दिगवळे सुतारवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.