हळवल सरपंच दीपक गुरव यांनी केलेला खुलासा हास्यास्पद

हळवल सरपंच दीपक गुरव यांनी केलेला खुलासा हास्यास्पद

*कोकण Express

*हळवल सरपंच दीपक गुरव यांनी केलेला खुलासा हास्यास्पद…!*

*केलेला भ्रष्टाचार उघड होऊ नये यासाठी सरपंच गुरव यांची तळमळ सुरू….!*

*ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन राणे यांचा टोला…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

हळवल सरपंच दीपक गुरव यांनी केलेला खुलासा हास्यास्पद असून ते जनतेल फसवण्याचे काम करत आहेत. सर्व्हे नं.७१व ७२ मध्ये चालू असलेले २५/१५ कामाचा हळवल गावातील किती लोकांना फायदा होणार आहे. सदर काम हे आम.वैभव नाईक यांनी जमीन विकत घेऊन प्लॉटिंग केलेल्या जागेत असून त्या कामाचा फायदा हा फक्त आणि फक्त आम. वैभव नाईक यांच्याकडून जमिनी खरेदी करणाऱ्या प्लॉट धारकांना होणार आहे. जर का त्या जागा विकून आम.वैभव नाईक यांना पैसे मिळणार असतील तर त्या प्लॉटिंगमधले रस्ते हे त्यांनी त्यांच्या खाजगी पैशातून करणे गरजेचे आहे. तसे न करता जनतेचा म्हणजेच २५/१५ या हेडखाली मंजूर करून घेतले. शासकीय निधी खर्च करायचा असेल तर रस्ता ग्रामपंचायत दप्तरी २३ नंबर ला नोंद करणे आवश्यक असते. ती नोंद केल्यामुळे हळवल गावचे सरपंच हे सदर रस्ता ग्रामपंचायत च्या मालकीचा असल्याचे विधान करत आहेत.

परंतु सरपंच दीपक गुरव यांनी हळवल गावामध्ये १६ वाड्या असून, गावातील अन्य रस्ते किंवा गटाराचा विचार न करता फक्त आणि फक्त सर्व्हे नं. ७१ व ७२ मधीलच रस्ते आणि गटारे का निवडली याचे उत्तर हळवल सरपंच यांनी द्यावे. इतर वाड्यांमध्येही पैसे खर्च करता आले असते परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाचे पैसे एका माळरानावर खर्च करण्यात येत आहेत.

तसेच कमीत कमी १५ ते २० लाख खर्च करून विद्युत ट्रान्सफार्मर, २ व ३ लाख खर्च करून स्ट्रीट लाईट ही कुणाच्या सर्व्हे नं मध्ये गेली याचा खुलासा हळवल सरपंच यांनी करावा. जेणेकरून रस्ते, गटार, स्ट्रीट लाईट आले की जमिनीचा दर वाढणार इमारती उभ्या राहण्याअगोदर शासकीय निधीचा वापर केला जात आहे. सदर प्रकणात हळवल सरपंच यांनी कोणते आर्थिक हित साधले याचाही खुलासा करावा. सदर सरपंच यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला असून गेल्या ४ वर्षात जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याला सत्तेच्या माध्यमातून दाबण्याचा व केलेला भ्रष्टाचार उघड येऊ नये म्हणून आम. नाईक यांची साथ मिळावी यासाठी सरपंच यांची तळमळ सुरू आहे.

तरी सुद्धा आम्ही हळवल वासीय सदर प्रकरणी गप्प बसणार नसून त्यासाठी जनआंदोलन उभारू आणि झालेला भ्रष्टाचार बाहेर काढू असा इशारा ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन राणे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!