जिल्हावासीयांना टोलमाफी मिळावी अन्यथा जनआंदोलन करणार

जिल्हावासीयांना टोलमाफी मिळावी अन्यथा जनआंदोलन करणार

*कोकण Express*

*जिल्हावासीयांना टोलमाफी मिळावी अन्यथा जनआंदोलन करणार*

*राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरसेवक अबीद नाईक यांचा इशारा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

ओसरगांव येथील टोलनाक्यावर टोल वसूलीच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. वास्तविक महामार्गाचे काम अपूर्ण असताना टोलवसूली सुरु करणे चुकीचे आहे. तसेच या टोलवसूलीत सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांना १०० टक्के टोलमाफी मिळावी यासाठी 2 जून रोजी सिंधुदुर्ग निवासी
उपजिल्हाधिकारी श्री भड़कवाड़ यांना राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले कुठल्याही परिस्थितित सिंधुदुर्ग वासीयांना टोल माफी झालीच पाहिजे अन्यथा राष्ट्रवादी पक्षातर्फे जनआंदोलन केले जाईल असे सांगत निवेदनाची प्रत राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार साहेब, सार्वजनिक बांधकाम कैबिनेट मंत्री ना अशोक चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. दत्तामामा भरने साहेब यांना देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक, राष्ट्रवादी प्रांतिक सदयस्य सावलाराम अनावकर गुरूजी , कणकवली राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, माजी तालुका अध्यक्ष विलास गावकर, माजी कुडाळ उपसभापति आर. के. सावंत, राष्ट्रवादी व्यापार उद्योग मालवण तालुका अध्यक्ष सूर्यकांत दाभोलकर, माजी आकेरी सरपंच संदीप राणे, गणेश चौगुले, विशाल ठाणेकर,आदि उपस्थित होते

मुंबई-गोवा महामार्ग हा काही नव्याने झालेला महामार्ग नाही. मुळात ३० मिटर रुंद असलेल्या या महामार्गाचे केवळ रुंदीकरण करण्यात आले. रुंदीकरण करण्यात आलेल्या या महामार्गावर टोलवसूली करणे चुकीचे आहे. मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर हा अन्याय आहे.

दुसरीकडे महामार्गांची अनेक कामे अद्याप प्रलंबीत आहेत. ज्याठिकाणी टोलचे कार्यालय सुरु करण्यात आलेले आहे, त्याठिकाणीच्या जमिन मालकांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. वागदे, नांदगाव येथेही मोबदला मिळणे बाकी आहे. तसेच याठिकाणी महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत आहे. केवळ ६५ कि.मी. रस्त्याचे काम झाल्याचे दाखवत टोल सुरु करणे योग्य नाही.

कणकवलीसह देवगड, वैभववाडी व मालवण तालुक्यातील नागरीकांना जिल्हा रुग्णालया पासून ते सर्व शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी ओसरगांव येथूनच जावे लागते. अशा स्थितीत त्यांना टोल भरावा लागणे हा जिल्हावासीयांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना १०० टक्के टोलमाफी मिळायलाच हवी. तसेच संपूर्ण महामार्गाचे काम होत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारे टोलवसूली करण्यात येऊ नये, अशी आमची मागणी आहे. आमच्या मागणीचा आपण सहानुभूतीपुर्वक विचार करून जिल्ह्याला टोलमाफी मिळवून द्यावी. अन्यथा जनआक्रोश निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!