*कोकण Express*
*भाजपा वेंगुर्ले च्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमीत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
आधुनिक भारताचे जनक , भारतीय संविधानाचे शिल्पकार , मानवी हक्काचे कैवारी , ज्ञानरत्न डाॅ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त भाजपा तालुका कार्यालयात प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली .
♦️यावेळी आदरांजली वाहताना शरदजी चव्हाण म्हणाले की भारताच्या पावन भुमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे . या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श , मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे . अशा या थोर महापुरुषांत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अभिमानाने घ्यावे लागेल . अशा या महापुरुषास भावपूर्ण श्रद्धांजली !!!
♦️यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , किसान मोर्चा चे बाळु प्रभु , बुथप्रमुख शेखर काणेकर , वायंगणी माजी सरपंच शामसुंदर मुननकर , ता.चिटनीस समीर चिंदरकर , जिल्हा चिटनीस अॅड. सुषमा खानोलकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर इत्यादी उपस्थित होते .