महाज्योतीतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे महात्मा ज्योतिबा फुले लिखित तृतीय रत्न नाटकाचा नि:शुल्क प्रयोग सादर

महाज्योतीतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे महात्मा ज्योतिबा फुले लिखित तृतीय रत्न नाटकाचा नि:शुल्क प्रयोग सादर

*कोकण Express*

*महाज्योतीतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे महात्मा ज्योतिबा फुले लिखित तृतीय रत्न नाटकाचा नि:शुल्क प्रयोग सादर*

*कासार्डे ः संजय भोसले*

कणकवली  येथील  वसंतराव आचरेकर प्रतिष्टान येथे ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे नि:शुल्क आयोजन करण्यात आले होते. या प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या शैक्षणिक ध्येयांनी प्रेरीत समाजिक विचारांचा प्रसार व्हावा, त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे या हेतूने राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकाचे प्रयोग करण्यात येणार आहेत.

इतर मागास बहुजन कल्याण विभाग तथा महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार, संचालक डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे, लक्ष्मण वडले यांनी महाज्योतीच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. अनिरुद्ध वनकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून त्यांच्यासह ३० कलाकार व सहकाऱ्यांचा या नाटकात सहभाग असणार आहे. यापुर्वी विविध जिल्ह्यात दहा प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. प्रेक्षक आणि माध्यमांकडून त्याला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. सदर नाट्यप्रयोगास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नाटकाचे दिग्दर्शक अनिरुध्द वनकर महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक भाप्रसे प्रदीपकुमार डांगे यांनी केले आहे.

1855 साली महात्मा जोतिबा फुलेंनी मनूवादी व्यवस्थेची लबाडी उघड करणारं तृतीय रत्न नाटक लिहीलं असून 150 वर्षानंतर विद्यमान काळातील मनूवादयांची कटकारस्थाने, कपटनिती उघड करण्यास हे नाटक ज्वलंत प्रहार आहे. हे नाटक प्रसिद्ध आंबेडकरी गायक /वादळवाराचे प्रमुख अनिरूद्ध वनकर यांनी दिग्दर्शित केलंय. मुंबईतील व्यवसायिक कलाकार हे नाटक करण्यास उपलब्ध होत नाहीत म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन हि प्रबोधन मालिका सशक्तपणे सुरू करण्यात आली आहे. महाज्योती नागपूर व महाराष्ट् सरकारच्या सहकार्याने या नाटकाचे मोफत प्रयोग केले जात आहेत.

बहुजन समाज जागा व्हावा हा उद्देश असला तरी बहुजनांनीसुद्धा या नाटकास भरभरून प्रतिसाद देणं गरजेच आहे. दिड तासाच्या या नाटकात मध्यंतर नाही, पूर्ण वेळ पाहताना प्रेक्षक अंतर्मूख होऊन जातो. नाटक संपूच नये असं वाटत असलं तरी भटजीच्या लबाडीचा पर्दाफाश होऊन पडदा पडतोच. त्याकाळीही बहुजन जागे झालेलं पण मूठभर आजही 150 वर्षापूर्वीचीच परिस्थिती आहे. समग्र बहुजन जागा झाला तर मनूस्मृतीच्या आधारे  अप्रत्यक्ष चाललेली भटजीगिरी कायमची गाडली जाईल. मनुवादयांच्या व्यवस्थेत मानसिक गुलामित  धन्य असणाऱ्या बहुजनांना तृतीय रत्न हे नाटक निश्चितपणे जागे करण्यास सहाय्याभूत ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!