आम. नितेश राणे यांच्या हस्ते फोंडाघाट ग्रा. पं. च्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा

आम. नितेश राणे यांच्या हस्ते फोंडाघाट ग्रा. पं. च्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा

*कोकण Express*

*आम. नितेश राणे यांच्या हस्ते फोंडाघाट ग्रा. पं. नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा*

*केंद्राच्या एम एस एम ई खात्याच्या माध्यमातून जर कोकम क्लस्टर केले तर हजारो जणांना रोजगार मिळेल*

*आ. नितेश राणे यांचे उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन*

*फोंडाघाट ः संंजना हळदिवे*

स्वातंत्र्यपूर्व काळात 1941 साली स्थापन झालेली फोंडाघाट ग्रा पं ही सिंधुदुर्गातील सर्वात मोठी ग्रा पं आहे. माझ्या 7 वर्षांच्या आमदारकीच्या कारकिर्दीतील सर्वात सुबक आणि देखणी अशी इमारत फोंडाघाट ग्रा.पं. ची आहे. आता केवळ सुबक इमारत बांधून थांबू नका तर फोंडाघाट मध्ये पोपट पवार सारखी दूरदृष्टी दाखवून फोंडाघाट चे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी नियोजन करा असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी फोंडाघाट ग्रा पं च्या नूतन इमारत उदघाटन प्रसंगी केले. आमदार नितेश राणेंच्या हस्ते फोंडाघाट ग्रा.पं. च्या नूतन भवन चे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत, माजी सभापती मनोज रावराणे, फोंडाघाट सरपंच संतोष आग्रे, उपसरपंच सुदेश लाड, माजी उपसभापती तुळशीदास रावराणे, माजी उपसभापती बबन हळदिवे, राजन चिके, सुजाता हळदीवे, माजी सरपंच भाई भालेकर, फोंडाघाट ग्रा पं चे सर्व ग्रा पं सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की,केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या एम एस एम ई खात्याचे बजेट साडे सतरा लाख कोटी आहे.तर महाराष्ट्र राज्याचे बजेट साडेचार लाख कोटी आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकम ची उलाढाल 400 कोटी आहे. केंद्राच्या एम एस एम ई खात्याच्या माध्यमातून जर कोकम क्लस्टर केले तर हजारो जणांना रोजगार मिळेल. फोंडाघाट पंचक्रोशीत आमदार म्हणून मी सुमारे 10 ते 12 कोटींची विकासकामे केली. या इमारतीत येणारा ग्रामस्थ आपले काम झाले आहे या समाधानाने माघारी गेला पाहिजे याची खबरदारी घ्या. एखाद्याचे काम झाले नाही तरी त्यांना सौजन्य आणि विनम्रतेने वागा. ग्रामस्थांच्या जीवनात अपेक्षित बदल आपल्या कार्यकाळात झाला पाहिजे याकडे लोप्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे. छप्परावर ताडपत्री असलेली ग्रा पं चे रूपांतर टोलेजंग इमारतीत करताना सरपंच संतोष आग्रे यांनी मोठी जिद्द दाखवली. सरपंच आग्रे यांनी भविष्यात फोंडाघाट विकासासाठी अशीच तळमळ ठेवावी असे आमदार राणे म्हणाले. ग्रा पं नूतन इमारत उदघाटन प्रसंगी फोंडाघाट ग्रा पं चे माजी सरपंच, माजी ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रा.पं कर्मचाऱ्यांचा आमदार नितेश राणेंच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!