*कोकण Express*
*एसटीच्या चाकाखाली डोके चिरडून युवकाचा मृत्यू*
*नॅशनल हायवेवर कसाल येथे दुर्घटना ; किरण वसंत हिर्लेकर असे मृताचे नाव*
*कणकवली ः प्रतिनिधी*
एसटीचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने ४५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर कसाल पुलानजीक घडली. किरण वसंत हिरलेकर (रा. कसाल-ढोकमवाडी) असे मृताचे नाव आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित मृत हे कणकवली-बेळगाव एसटीमधून कसाल पुलानजीक ढोकमवाडी रस्त्यावर उतरले. मात्र तोल जाऊन ते रस्त्यावर कोसळल्यामुळे एसटीचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघाताची माहिती महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.