जि. प. शाळांच्या दुरुस्तीसाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

जि. प. शाळांच्या दुरुस्तीसाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

*कोकण Express*

*जि. प. शाळांच्या दुरुस्तीसाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन…!*

*आंदोलनकर्त्यांशी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी भेट घेत केली चर्चा…!*

*मात्र दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात सुरु होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा आंदोलनकर्त्याचा पवित्रा…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील मोडकळीस आलेल्या जि. प. शाळांच्या इमारती पावसाळा सुरु होण्यापूर्वी दुरुस्ती करावी, या मागणीसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजेरकर व
काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रवीण वरुणकर यांनी पंचायत समितीच्या जुन्या इमारतीसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनकर्त्यांशी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी चर्चा
करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, श्री. मांजरेकर यांनी जोपर्यंत शाळांच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात सुरु होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार, असा पवित्रा घेतल्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरली. गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी भेट घेत मोडकळीस आलेल्या शाळांच्या दुरुस्ती त्वरित होण्यासंदर्भात बांधकाम विभागाकडे पाठपुरवठा सुरु असून ही दुरुस्तीची कामे लवकरात लवकर पूर्ण होतील, असे आश्वासन देत श्री. मांजेरकर यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, शाळांच्या दुरुस्तीची कामे प्रत्यक्षात सुरु होत नाही, तोपर्यंत हे
ठिय्या आंदोलन मी ४ जूनपर्यंत सुरु ठेवणार असून ५ जूननंतर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा श्री. मांजेरकर यांनी दिला. याशिवाय कणकवली नं. ५ शाळेची पावसाळ्यापूर्वी त्वरित दुरुस्ती होणे आवश्यक असून शहरात असलेल्या जि.प.शाळांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून या शाळांकडे लक्ष देण्यास आपणास वेळ मिळत नसेल तर या शाळा न.पं.कडे वर्ग कराव्यात,अशी मागणी श्री. मांजरेकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!