हरकुळ खुर्द, लोरे, ओझरम लघु पाटबंधारे तलावांना नवीन पाईपलाईन द्यापालकमंत्र्यांकडे शिवसेना नेते सतीश सावंत यांची मागणी

हरकुळ खुर्द, लोरे, ओझरम लघु पाटबंधारे तलावांना नवीन पाईपलाईन द्यापालकमंत्र्यांकडे शिवसेना नेते सतीश सावंत यांची मागणी

*कोकण Express*

*हरकुळ खुर्द, लोरे, ओझरम लघु पाटबंधारे तलावांना नवीन पाईपलाईन द्यापालकमंत्र्यांकडे शिवसेना नेते सतीश सावंत यांची मागणी*

*ओरोस ः पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देताना सतीश सावंत सोबत मंगेश सावंत, महेंद्र डिचवलकर व इतर.*

*कणकवली ःःप्रतिनिधी* 

कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द लघु पाटबंधारे तलावातून शेतीसाठी नवीन पाईपलाईन मिळावी, लोरे लघु पाटबंधारे तलाव लाभ क्षेत्रातील पी.व्ही.सी. पाईप बदलून मिळावेत. तसेच ओझरम लघुपाटबंधारे तलावातून शेतीसाठी नवीन पाईपलाईन मिळावी अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केली. कालव्यांच्या पाईपलाईन होत असलेल्या गळतीमुळे व पाईपलाईन चॉकअप झाल्याने शेतीला अपूरा पाणीपुरवठा होण्याच्या समस्येकडे सतीश सावंत यांनी शासनाचे लक्ष वेधत त्यावर उपाययोजनांची मागणी केली आहे.*
*कणकवली तालुक्यातील हरकुळ लघु पाटबंधारे तलाव हरकुळ गावामध्ये स्थानिक नाल्यावर सन 1976 मध्ये बांधणेत आला आहे. सदर तलावाचा एकूण पाणीसाठा 2.652 द.ल.घ.मी असून माती धरणाची लांबी 240 मी. आहे. तलावाचे लाभक्षेत्र 106 हेक्टर आहे. सदर तलावाचा उजवा कालवा 2.50 कि. मी. व डावा कालवा 3 कि. मी. लांबीचा असून पाटबंधारे विभागामार्फत (कडा) सन 1993-94 मध्ये कालव्यामध्ये आर. सी. सी. पाईप (सिमेंटची पाईप) व लाभक्षेत्रात पी. व्ही. सी पाईपचे काम करणेत आले आहे. सन 1994 ते 2003 पर्यंत पाईप लाईन मधून शेतीसाठी व्यवस्थित पाणी पुरवठा होत होता परंतु त्यानंतर कालव्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांची मुळे सिमेंट पाईपच्या सांध्यातून पाईपमध्ये जावून पाईप चोकअप होऊ लागली व पाईपला गळती लागली. त्यामुळे पाईपमधून अपेक्षित प्रेशरने शेतीला पाणी पुरवठा मिळत नाही व प्रत्येक वर्षी पिकाखालील क्षेत्र कमी होत गेले. या सर्व कारणांमुळे शेतीला व पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही, यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कालव्यातील सिमेंटच्या पाईप ऐवजी झाडांची मुळे जाणार नाहीत व गळती होणार नाही अशी एच.डी.पी.ई. पाईप घालावी व पी. व्ही. सी पाईप लाईन व व्हॅाल्व यांची दुरूस्ती करणेत यावी अशा प्रकारची आग्रहाची मागणी हरकुळ येथील ग्रामस्थांची आहे. कालवा दुरूस्तीची कामे झालेनंतर 106 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येणार आहे. तसेच शेतीसाठी व पिण्यासाठी विहीरींना पुरेसे पाणी मिळू शकणार आहे.*
*लोरे लघु पाटबंधारे तलाव येथे कालव्यामध्ये 6 कि.मी. एच.डी.पी.ई. पाईपचे काम करणेत आले आहे. 30 वर्षापूर्वी लाभक्षेत्रात विमोचकासाठी 2.50 घस.चे पी.व्ही.सी. पाईप वापरण्यात आले होते. परंतु आता सदरची पी.व्ही.सी. पाईपलाईन जीर्ण, खराब झाली आहे. पाण्याच्या प्रेशरने ही पी.व्ही.सी. पाईप बर्‍याच ठिकाणी फुटलेली आहे. व काही ठिकाणी चोकअप झाली आहे. त्यामुळे शेतीला, माड, काजू, बागायतीला पुरेसे पाणी मिळत नाही. म्हणून शेतक-याच्या वारंवार तक्रारी येत आहेत.*
*ओझरम लघु पाटबंधारे तलाव ओझरम गावामध्ये स्थानिक नाल्यावर सन 1980-81 मध्ये बांधणेत आला आहे. सदर तलावाचा एकूण पाणीसाठा 1.91 द.ल.घ.मी असून माती धरणाची लांबी 534 मी. आहे. तलावाचे लाभक्षेत्र 50 हेक्टर आहे. सदर तलावाचा कालवा 3 कि. मी. लांबीचा असून पाटबंधारे विभागामार्फत (कडा) सन 1993-94 मध्ये कालव्यामध्ये आर. सी. सी. पाईप (सिमेंटची पाईप) व लाभक्षेत्रात पी. व्ही. सी पाईपचे काम करणेत आले आहे. सन 1994 ते 2000 पर्यंत पाईप लाईन मधून शेतीसाठी व्यवस्थित पाणी पुरवठा होत होता परंतु त्यानंतर कालव्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांची मुळे सिमेंट पाईपच्या सांध्यातून पाईपमध्ये जावून पाईप चोकअप होऊ लागली व पाईपला गळती लागली. कालव्यातील सिमेंटच्या पाईप ऐवजी झाडांची मुळे जाणार नाहीत व गळती होणार नाही अशी पाईप घालावी व पी. व्ही. सी पाईप लाईन व व्हॅाल्व यांची दुरूस्ती करणेत यावी अशा प्रकारची आग्रहाची मागणी ओझरम येथील ग्रामस्थांची आहे.कालव्यातील 30 वर्षापूर्वीची जूनी 3 कि. मी. लांबीतील सिमेंटची पाईप लाईन काढून त्याठिकाणी एच. डी. पी. ई., पी. व्ही. सी. पाईप लाईन करणे व लाभक्षेत्रातील पी. व्ही. सी पाईप लाईन, स्लुईस व्हॅाल्व यांची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. कालवा दुरूस्तीची कामे झालेनंतर 50 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येणार आहे. तसेच शेतीसाठी व पिण्यासाठी विहीरींना पुरेसे पाणी मिळू शकणार आहे.हरकुळ खुर्द, लोरे व ओझरम या तिन्ही ल. पा. योजनांच्या नवीन पाईपलाईनचे काम मंजूर करणेसाठी जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे शिफारस करत त्याला मंजूरी द्यावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना नेते सतीश सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!