*कोकण Express*
*खांबाळे येथे मोफत पीएम किसान योजना शिबीर संपन्न*
*शिवसेना वैभववाडी तालुका प्रमुख मंगेश लोकेंचा पुढाकार*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
खांबाळे येथे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्या माध्यमातून गावातील वयोवृद्ध, अपंग व जे पीएम किसान योजनेची केवायसी करण्यापासून वंचीत राहिले होते, अशा शेतकऱ्यांसाठी मोफत पीएम किसान शिबीर ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाले. अल्प भूधारक तसेच गरजवंत शेतकऱ्यांनाच पी. एम. किसान योजनेचा लाभ मिळावा हा उद्देश ठेवून 2016 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांच्या तृटीमधील पूर्तता दूर करण्याच्या उद्देशाने शासनाने केवायसी करणे बंधनकारक केले होते. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना गावातच मोफत सेवा गावचे सुपुत्र मंगेश लोके यांनी स्वखर्चातुन उपलब्ध करून दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी शिवसेनातालुका प्रमुख मंगेश लोके, सरपंच गौरी पवार, उपसरपंच गणेश पवार, दीपक पवार, गणेश सदाशिव पवार, निरंकारी कॉम्प्युटरचे तेजस साळुंखे, सेतू सुविधा केंद्राचे प्रथमेश विटेकर, अंबाजी पवार, राजेंद्र देसाई, अक्षय पवार, गणेश कदम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.