*कोकण Express*
*कणकवली तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींचा स्ट्रीट लाईट विद्युत पुरवठा खंडीत…*
*विजबिले झाली थकीत; नागरिकांवर काळोखात फिरण्याची वेळ…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोरोना काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश ग्रामिण भागातील “स्ट्रीट लाईट” लाखोंची बिले थकीत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून एका गावचे सरासरी ८-१० लाख रुपये थकीत विजबिल झाली आहेत. त्यामुळे वीज वितरण कंपनीने अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे मे महिन्यात ग्रामीण भागातील नागरिक व मुंबई कर चाकरमान्यांना अंधारात चाचपडत फिरण्याची वेळ आली आहे.
कणकवली तालुका स्ट्रीट लाईट अभावी अंधारात असल्याचे दिसून येत आहे.मध्यंतरी शासनाने प्रत्येक गावातील स्ट्रीट लाईट विज बिल हे ग्रामपंचायतीच्या १४ व १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून भरण्यासाठी आदेश दिले होते. मात्र संबंधित निधी मंजूर आराखडे तयार करण्यात आलेल्या नुसार आहेत. तेव्हा गावची विकास कामे पूर्ण करावीत की, लाईट बिले भरावीत विज बिल न भरण्यासाठी प्रत्येक गावातील सरपंच व सरपंच संघटनेने विरोध केला .
याबाबत वारंवार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी,विज वितरण कंपनीचे अधिकारी यांना सरपंच संघटनेने पत्रव्यवहार केला आहे . काही गावांमध्ये तर १० होत आले आहेत. स्ट्रीट लाईट विद्युत पुरवठा तोडून यामुळे कणकवली तालुका तसेच जिल्ह्यातील बहुतांश गावातील ग्रामिण भाग स्ट्रीट लाईट अभावी अंधारात असल्याचे दिसून येत आहे.
सरपंच संघटना सोमवार दिनांक ३० मे धडक देणार..
या सर्व पार्श्वभूमीवर कणकवली तालुका सरपंच संघटना सोमवार दिनांक ३० मे रोजी सकाळी १०.३० वाजता विज वितरण कंपनी कणकवली येथे कार्यालयात धडक देणार असल्याचे सरपंच संघटनेकडून सांगण्यात येत आहे.