देऊळवाडा पुलातील गाळ उपसा कामास आजपासून सुरवात

देऊळवाडा पुलातील गाळ उपसा कामास आजपासून सुरवात

*कोकण Express*

*देऊळवाडा पुलातील गाळ उपसा कामास आजपासून सुरवात*

*मनसेचे अमित इब्रामपूरकर यांनी केला होता पाठपुरावा*

*मालवण  ः प्रतिनिधी*

शहरातील देऊळवाडा पुलातील गाळ काढण्याच्या कामास एक लाख रुपयांचा निधी पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी मंजूर केला आहे. त्यानुसार आजपासून कामाला सुरुवात होणार असून हे काम मार्गी लागण्यासाठी मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी यशस्वी पाठपुरावा केला. हे काम मार्गी लागल्याने देऊळवाडा परिसरातील नागरिकांनी पालिकेचे मुख्याधिकारी तसेच प्रशासनाचे आभार मानले आहेत.

देऊळवाडा परिसरातील नागरिकांनी दोन महिन्यापूर्वी पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक संतोष जिरगे तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे लक्ष वेधत देऊळवाडा पूल परिसरात माती व गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे. पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमध्ये रस्त्यावर पाणी साचून राहते व आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण होतो तसेच गणेश चतुर्थीच्या वेळी गणेश विसर्जन करताना अनेक गणपतीचे विसर्जन संपूर्णतः होत नाही. त्यामुळे आपण आपल्या अधिकाराखाली गणपती विसर्जन भागातील पुलाखालील साचलेला गाळ काढण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली होती. या निवेदनाचा यशस्वी पाठपुरावा मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केला. त्याची दखल घेत मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी १ लाख रुपये निधी मंजूर केला. गाळ उपसा करण्याचे काम आजपासून सुरू होणार आहे. याबद्दल देऊळवाडा पुल परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी व पालिका प्रशासनातील अवेक्षक सुधाकर पाटकर अभियंता सोनाली हळदणकर यांचे आभार मानले आहेत.

गेली पंचवीस वर्ष या भागातून निवडून दिलेले नगरसेवक देऊळवाडा पुलातील गाळ व माती उपसा करण्याचे काम करू शकले नाहीत. पण जागरूक नागरिकांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आणि मुख्याधिकाऱ्यांनी तत्काळ त्याची दखल घेऊन काम मार्गी लावले. त्यामुळे आता निवडून दिलेल्या देऊळवाडा प्रभागातील सर्व नगरसेवकांनी आत्मपरीक्षण करावे. नागरिकांमध्ये एकी असेल तर नगरसेवकांशिवाय कामे मार्गी लागतात हे लक्षात ठेवावे असे श्री. इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!