*कोकण Express*
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात…!*
*असलदे वृध्दाश्रमात वृद्धांसाठी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन*
*नांदगाव ः प्रतिनिधी*
रविवार दिनांक 29 मे, 2022 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता सर्व दूरदर्शन वाहिनीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला आहे. सर्व भाजपा लोकप्रतिनिधी, शक्तीकेंद्रप्रमुख, बूथ प्रमुख यांनी एकत्र येत ‘मन की बात’ हा कार्यक्रम एकत्र पाहून लाभ घेतला. तसेच असलदे येथील दिविजा वृध्दाश्रम येथील सर्व वृध्द आजी अजोबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम मोठ्या स्क्रीनवर पाहण्याचा योग वृध्दाश्रमने उपलब्ध करून दिला. यावेळी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, वृध्दाश्रमच्या दिपीका रांबाडे आदी उपस्थित होते.