*कोकण Express*
*नाटळ मोगरणेवाडी धरणाला द्यावी मंजुरी*
*2012 साली झालाय धरणाचा सर्व्हे*
*शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांची खा. अनिल देसाईंकडे मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नाटळ मोगरणेवाडी येथील प्रलंबित असलेले धरण लवकरात लवकर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मध्यमातून मंजुर करावे, अशी मागणी शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यांच्याकडे आज शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, दिनेश बोभाटे, शाखाप्रमुख सचिन सावंत, गौरव सावंत, मुन्ना तेली यांनी केली.
२०१२ साली सर्वे झाल्यानंतर आजतागायत हे धरण मंजुर झाले नाही आणि हे धरण मंजुर झाले तर नाटळ संपुर्ण गाव ओलिताखाली येईल म्हणून तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत हे सतत खासदार विनायक राऊत तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडुन पाठपुरावा करत आहेत आणि या पाठपुराव्याला अधिक गती मिळावी म्हणून त्यांनी खासदार अनिल देसाई यांना पत्र देऊन धरणाबद्दल पुर्ण माहिती दिली. यावेळी खा. अनिल देसाई यांनी आपण स्वतः याचा पाठपुरावा करतो व हे नाटळ गावातील धरण मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन हा प्रलंबित प्रश्न नक्कीच सोडवू, अशी ग्वाही दिली.