वेंगुर्ले तालुका उपसरपंच अध्यक्ष”पदी” मठ ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्री. निलेश नाईक यांची निवड*

वेंगुर्ले तालुका उपसरपंच अध्यक्ष”पदी” मठ ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्री. निलेश नाईक यांची निवड*

*कोकण Express*

*वेंगुर्ले तालुका उपसरपंच अध्यक्ष”पदी” मठ ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्री. निलेश नाईक यांची निवड*

*तर उपाध्यक्ष”पदी”मोचेमाड ग्रामपंचायतीचे उपसंरपंचश्रीकांत घाटे यांची निवड तर सचिव”पदी”रेडी ग्रामपंचायतीचे उपसंरपंच नामदेव राणे यांची निवड करण्यात आली आहे*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

वेंगुर्ले तालुक्याची उपसरपंच संघटनेची बैठक शनिवार दि.२८ मे रोजी सकाळी १० वाजता साईमंगल कार्यालय वेंगुर्ले येथे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.या बैठकीत वेंगुर्ले उपसरपंच संघटनेच्या अध्यक्ष”पदी”शैक्षणिक सामजिक समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले मठ गावचे उपसरपंच श्री. निलेश प्रकाश नाईक यांची निवड करण्यात आली.तर मोचेमाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. श्रीकांत घाटे यांची उपाध्यक्ष”पदी”निवड केली आहे.तर सचिव”पदी”रेडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच नामदेव राणे यांची एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी उपसरपंच संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.आबा खवणेकर यांनी नवनिर्वाचित वेंगुर्ले तालुकाध्यक्ष निलेश नाईक,उपाध्यक्ष श्रीकांत घाटे व सचिव नामदेव राणे या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मानपर सत्कारासह अभिनंदन करत कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

तर यावेळी उभादांडा ग्रामपंचायतीचे उपसंरपंच गणपत केळुसकर,आरवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. रिमा मेस्त्री,सागरतिर्थ ग्रामपंचायतीच्या उपसंरपंच सुषमा गोडकर,दाभोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर,उपसरपंच हेमांगी तेली आदि उपसरपंच यावेळी उपस्थितीत होते.

तर वेंगुर्ले तालुका उपसंरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी निलेश नाईक यांची निवड झाल्याबद्दल मठ गावातून तसेच सर्व स्तरातून श्री. नाईक यांच्यावर अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!