*कोकण Express*
*शेर्पे गावात रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद*
*खारेपाटन ःःप्रतिनिधी*
ग्रामपंचायत शेर्पे व श्री काळेश्वरी नवतरुण विकास मंडळ पाटिलवाडी , सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान व हातभार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत शेर्पे येथे गुरुवार दिनांक २६ मे २०२२ रोजी रक्तदान शिबीर व मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्री.बाळा जठार यांनी उपस्थिती लावली.या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री बाळा जठार, शेर्पे गावचे सरपंच श्रीम निशा गुरव,मंडळाचे अध्यक्ष श्री सुरेश शेलार,गावचे पोलिस पाटील श्री विनोद शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तर शेर्पे ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीम.निशा गुरव व माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार यांच्या उपस्थितीत पाहुणे मंडळी तसेच ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कोकणचा तडाखा न्यूजचे संपादक व पत्रकार आबा खवणेकर यांचाही यावेळी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सरपंच श्रीम.निशा गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना शेर्पे गावच्या सरपंच श्रीम.निशा गुरव यांनी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करताना मंडळाचे विशेष कौतुक केले.तसेच मंडळाने असे नवनवीन उपक्रम राबविले पाहिजेत व बाकिच्या वाडीने श्री काळेश्वरी नवतरुण विकास मंडळ पाटिलवाडी या मंडळाचा आदर्श घ्यावा असे गौरवोद्गार काढले.तर मंडळाचे अध्यक्ष श्री सुरेश शेलार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना ग्रामपंचायत व तसेच ग्रामस्थ यांनी शिबीरासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले तसेच गावामध्ये कधीही गरज लागल्यास मंडळ आपल्या पाठीशी उभे राहिल व यापुढेही मंडळाकडून गावामध्ये लोकउपयोगी कार्य घडत राहतील अशी ग्वाही दिली.तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व जिल्हा परिषद सदस्य श्री बाळा जठार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना गावामध्ये एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज लागल्यास कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते याची सर्वांना माहिती दिली.तसेच रक्तदान का करावे याविषयी मार्गदर्शन केले.तसेच शेर्पे ग्रामपंचायत ही खारेपाटन तालुक्यात ग्रामीण भागात असुनही येथील ग्रामस्थ एकजुटीने काम करत आहेत.तर सरपंच निशा गुरव यांनीही सरपंच पदाचा कार्यभार स्विकारल्या नंतर या शेर्पे गावाचा कायापालट केला आहे.आज सरपंच या महिला असुनही सर्व गावातील ग्रामस्थांना एकत्र आणून विविध योजनाही त्या गावात राबवत आहेत.तर भव्य रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून,गावात एक आदर्श निर्माण केला आहे.असेही गौरवोद्गार श्री.जठार यांनी उदघाटन प्रसंगी काढले.तर रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केल्याबद्दल ग्रामपंचायत शेर्पे व श्री काळेश्वरी नवतरुण विकास मंडळ पाटिलवाडी यांचेही श्री जठार यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला मंडळाचे सचिव विलास शेलार,प्रफुल्ल शेलार,खजिनदार प्रकाश सावंत,अनिकेत शेलार,ग्रामसेवक धुमाळे भाऊ,हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्गचे संस्थापक सचिव एकनाथ चव्हाण,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आबा खवणेकर,पोलीस पाटील विनोद शेलार,अध्यक्ष सुभाष शेलार,पत्रकार संदिप चव्हाण,शेर्पे सोसायटीचे चेअरमन परशुराम बेळणेकर,सिंधु रक्त प्रतिष्ठाचे सचिव ॠषिकेश जाधव,ग्रामपंचायत सदस्य सिराज मुजावर,शबाना मानाजी,आशासेविका सरीता शेलार,आरोग्य सेवक निलेश जाधव,माजी सरपंच धनराज शेलार,चंद्रकांत शेलार,सिंधुदुर्ग जिल्हा रक्त पेढीचे डाॅ.अमित आवळे,श्री अक्षय शेळके,सुनिल वानोळे,उल्हास राणे,श्री ओगले,सुरेश डोंगरे,नितीन गावकर,शुभांगी ऑप्शिटीशन सावंतवाडीचे विष्णू तेंडोलकर,सचिन हरमलकर तसेच पाटीलवाडी नवतरुण मंडळाचे सर्व सदस्य व शेर्पे गावातील ग्रामस्थ व कर्मचारी यावेळी उपस्थितीत होते.
तर रक्तदान शिबीरामध्ये ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले व ५१ जणांनी मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये आपले नेत्र तपासणी करून घेतली.शिबिरासाठी सहकार्य करणारे तसेच सहभाग घेणाऱ्या सर्वांचे सरपंच निशा गुरव यांनी आभार मानले.