*कोकण Express*
*महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सरकारच्या माध्यमातून केलेली कामे जनतेपर्यंत पोचवणे हे प्रत्येक शिवसैनिकाचे काम आहे*
*गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक आपल्याला शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून निर्माण करायचे आहेत*
*खांबाळे गणातील मेळाव्यात पक्ष निरीक्षक शशिकांत करशिंकर यांनी केले प्रतिपादन*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सरकारच्या माध्यमातून केलेली कामे जनतेपर्यंत पोचवणे हे प्रत्येक शिवसैनिकाचे काम आहे. गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक आपल्याला शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून निर्माण करायचे आहेत. शिवसेना पक्ष अधिकाधिक मजबूत करून तळागाळापर्यंत पोचवणे हे आपल्या सर्वांचे काम आहे असे प्रतिपादन शिवसंपर्क अभियानाचे वैभववाडी पक्ष निरीक्षक शशिकांत करशिंकर यांनी केले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे खांबाळे पंचायत समिती गणातील मेळाव्यात ते मार्गदर्शन पर बोलत होते.
यावेळी पक्ष निरीक्षक संजय पांडे, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, जिल्हाकार्यकारणी सदस्य संभाजी रावराणे, आचिर्णे ग्रामपंचायत सदस्य महेश रावराणे, खांबाळे सरपंच गौरी पवार, उपसरपंच गणेश पवार, सांगूळवाडी शाखाप्रमुख स्वप्नील रावराणे, कट्टर शिवसैनिक दिपक पवार, जयेश पवार, सोनाळी शाखाप्रमुख नितेश शेलार, नितीन रावराणे, खांबाळे प्रभाग शाखाप्रमुख दिनेश पालकर, प्रदीप लांजवळ, टेंबवाडी गटप्रमुख मंगेश कांबळे, सत्यवान सुतार, गणेश कदम, गणेश सदाशिव पवार, आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.